आर्थिक सुधारणांच्या दुसर्‍या इनिंगसाठी सरकारची तयारी

October 4, 2012 10:13 AM0 commentsViews: 6

04 ऑक्टोबर

केंद्र सरकार आर्थिक सुधारणांचा आपला धडाका सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आर्थिक सु़थारणांच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. आज होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवृत्तीवेतन क्षेत्रात 26% तर विमा क्षेत्रात 49% परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या निवृत्तीवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस परवानगी नाहीये तर विमा क्षेत्रात 26% परकीय गुंतवणुकीची मर्यादा आहे.

या बैठकीत औषध दरनिश्चिती धोरणासंदर्भातसुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक औषथ तज्ञांनी या धोरणात त्रुटी असल्याचा आक्षेप घेतला आहे. या धोरणामुळे औषध दरांसंदर्भात ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी दीर्घकालीन दृष्टीने हे धोरण फायदेशीर नसल्याचा तज्ञांचा दावा आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने किरकोळ आणि हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी दिली तर माध्यमांमधील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली होती. दरम्यान, आर्थिक सुधारणांच्या या चर्चेमुळे शेअर बाजारातही तेजी आली आहे. सेन्सेक्स 19 हजारांवर पोहोचला आहे.

close