अबू जुंदलला 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

October 3, 2012 10:14 AM0 commentsViews: 4

03 ऑक्टोबर

नाशिकमध्ये घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले अबू जुंदाल, बिलाल आणि बेग यांच्यावरच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू झाली आहे. याप्रकरणातील आरोपी अबू जुंदल याला 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर 2010 मध्ये नाशिकमधली पोलीस ट्रेनिंग ऍकडमी, देवळाली कॅम्प यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणींची रेकी केल्याच्या आरोपावरून बिलाल आणि हिमायत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. पुढे या खटल्यातला सातवा फरार आरोपी अबू जुंदाल याची कस्टडी मुंबई एटीएसनं घेतली. दहशतवादी कारवाया करणं, बीडपासून पाकिस्तानपर्यंत नेटवर्क उभारणं, तरुणांना ट्रेनिंग देऊन त्यांचा स्लीपर सेल उभारणं हे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट, परदेशी चलन, सीमकार्ड आणि शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आलीत.

close