रविवारपासून टॅक्सीचालकांचा बेमुदत संप

October 3, 2012 10:53 AM0 commentsViews: 2

03 ऑक्टोबर

किमान भाड्यात 3 रुपयांची वाढ करावी या मागणीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून टॅक्सीचालक संघटनांने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. रविवारपर्यंत ही भाडेवाढ लागू करावी अन्यथा बेमुदत संप अटळ आहे असंही संघटनेनं स्पष्ट केलंय. हकीम समितीने नुकतेच आपल्या अहवालात टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांनी वाढ करावी अशी शिफारस राज्य सरकारकडे केली. सरकारनेही काही सुधारणा करुन शिफारस स्वीकारली असून त्यात नाममात्र 1 रुपयांची वाढ करण्यास अनुमती दिली. मात्र टॅक्सीचालक संघटनेनं तीन रुपये वाढ करण्यातच यावी अशी मागणी केली आहे. आपली मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा येत्या रविवारी मध्यरात्रीपासून टॅक्सीचालक, मालक संपावर जाणार आहे. या संपात 4 टॅक्सी चालक संघटना सहभागी होणार आहेत.

close