मुंबई विमानतळाच्या सुरक्षेची ऐशी तैशी

October 4, 2012 11:11 AM0 commentsViews: 3

04 ऑक्टोबर

मुंबई विमानतळावर काल बुधवारी 3 तास सुरक्षा व्यवस्था नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कस्टम अधिकारी आणि सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांमध्ये वाद झाल्यानं सीआयएसएफच्या कर्मचार्‍यांनी गेट नंबरवर काम करणं बंद केलं. या गेटवरील सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. सीआयएसएफनं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे अखेर कस्टमच्या अधिकार्‍यांना सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहावं लागलं. कस्टमच्या अधिकार्‍यांनी सीआयएसएफ जवानांच्या पास नसलेल्या 2 गाड्या थांबवल्याचा राग आल्यानं सीआयएसएफनं हा आडमुठा बहिष्कार टाकल्याचं सूत्रांकडून समजतं.

close