फिक्सिंग प्रकरणी 6 अंपायर्सवर बंदी

October 10, 2012 12:24 PM0 commentsViews: 3

10 ऑक्टोबर

मॅच फिक्सिंग प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सहा अंपायर्सवर बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीनं आज हा निर्णय जाहीर केला. इंडीया टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहा अंपायर्सनं फिक्सिंग केल्याचं उघडकीस आणलं होतं. या प्रकरणाची आयसीसीनं गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या अंपयार्सपैकी एक अंपयार आयसीसी पॅनेलमध्ये आहेत तर दोनजण आंतरराष्ट्रीय अंपायर आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे.

close