‘त्या’ वस्तीत आढळला आणखी एक मृतदेह

October 10, 2012 12:37 PM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर

नागपूरमधल्या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. नागपुरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत अजून एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. इक्बाल आणि भाऊ अक्रम यांनी हा मृतदेह पुरला होता. हा मृतदेह पुरताना नागरिकांनी त्यांना विरोध केला. यावेळी झालेल्या भांडणात जमावानं इक्बालला ठेचून मारलं. तर मुख्य आरोपी असलेला इक्बालचा भाऊ भुरु उर्फ शेख अक्रम हा जमावाच्या तावडीतून वाचला होता. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. हा मृतदेह कोणाचा होता हे अजून स्पष्ट झालं नाही. याबाबत शेख अक्रमची कसून चौकशी केली जात आहे.

या दोघा भावांच्या गुंडांची झोपडपट्टीत प्रचंड दहशत होती. हे गुंड झोपडपट्टीत दारु, गांजा अशा अमली पदार्थांची विक्री करायचे. आणि व्यसनी तरुणांना जबरदस्तीनं अवैध धंद्यात ओढायचे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुंड कधीही कुणाच्याही घरात घुसायचे आणि त्रास द्यायचे. त्यामुळे या झोपडपट्टीतले लोकं प्रचंड दहशतीत होते. त्यातचं या गुडांचं पोलिसांशी साटंलोटं असल्यामुळे, लोकं त्याच्याविरुद्ध तक्रार करायलाही घाबरत होते. अखेर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी जवळपास 400 लोकांच्या जमावानं या गुंडावर हल्ला चढवून त्याला ठार केलं. आता मुख्य आरोपी असलेल्या शेख अक्रमला जवामाच्या ताब्यात द्यावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे.

close