गुगलने अँपलविरोधातला दावा घेतला मागे

October 3, 2012 12:32 PM0 commentsViews: 7

03 ऑक्टोबर

सॅमसंग आणि ऍपल यांच्यातील पेटंट युध्द जरी सुरु असलं तरी गुगलनं ऍपलविरोधात दाखल केलेला दावा मात्र मागे घेतला आहे. गुगलच्या मालकीच्या मोटोरोला मोबिलिटीनं अमेरिकनं आयोगाकडे पेटंटविरोधात हा दावा दाखल केला होता. युएस इंटरनॅशनल ट्रेड कमिशनसमोर दाखल केलेल्या कागदपत्रानुसार मोटोरोला मोबिलिटीनं या प्रकरणातील नुतनीकरणाचे अधिकार सुरक्षित ठेवले आहे. दोन्ही कंपन्यांमधे कोणताही समजौता झाला नसल्याचं गुगलचं म्हणणं आहे. ऍपलनं ई मेल ऍलर्ट,व्हॉईस कन्ट्रोल,व्हिडिओ यासह 6 वैशिष्ठ्यांशी निगडीत पेटंटचं उल्लंघन केल्याचा आरोप मोटोरोलानं या दाव्यात केला होता. दरम्यान, मोटोरोलानं दावा जरी मागे घेतला असला तरीही दाव्यातील आरोपांची चौकशी करण्याची योजना तयार करण्यात येणार असल्याचे संकेत कमिशननं दिले आहे.

close