कोल्हापुरात पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला

October 10, 2012 2:27 PM0 commentsViews: 5

10 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात काल मंगळवारी रात्री एका पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला झालाय. सुनिल ठोंबरे असं या पोलिसाचं नाव असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झालीय. गोखले कॉलेज चौकात काल रात्री दहाच्या सुमाराला ठोंबरे यांनी हुल्लडबाजी करणार्‍या काही तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी ठोंबरे यांच्यावरच हल्ला केला. यामुळे संतापलेल्या लोकांनी हल्लेखोरांची वाहनं जाळली. पोलिसांनी श्रीधर जाधव आणि अजित नाईक या हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. जवाहरनगर परिसरातल्या आर.सी गँगचे हे तरूण असल्याचा संशय आहे.

close