नाशिकमध्ये उद्यापासून कांद्याचे लिलाव बंद

October 4, 2012 7:38 AM0 commentsViews: 8

04 ऑक्टोबर

नाशिकमधील कांद्याचे घाऊक बाजार उद्यापासून बेमुदत बंद राहाणार आहेत. लेव्ही वसुलीवरून हमाल – मापारी आणि व्यापारी यांच्यात वाद सुरू आहे. लेव्हीची थकबाकी मिळावी अशी हमाल आणि मापार्‍यांची मागणी आहे. तर काम नाही तर लेव्ही कसली असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या वादातून तोडगा निघालेला नाही. शेवटी उद्यापासून जिल्ह्यातल्या सगळ्या मार्केटमधले कांद्याचे लिलाव बंद राहाणार आहेत. मापारी आणि व्यापारी यांच्या या वादात यात कांदा उत्पादक शेतकरी आणि सामान्य ग्राहक नाहक भरडला जातोय.

close