टॅक्सीचालक संपात सहभाग नाही -शरद राव

October 4, 2012 2:29 PM0 commentsViews: 5

04 ऑक्टोबर

रविवारी मध्यरात्रीपासून 3 रुपये भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा क्वाड्रोस यांच्या टॅक्सी युनियनने दिला आहे. पण या संपामध्ये शरद राव आणि नितेश राणे यांच्या टॅक्सी युनियन सहभागी होणार नाही. तर टॅक्सीचालकांच्या मागणीसाठी संप करण्याची गरजच नाही, क्वाड्रोस कारण नसताना सरकारला वेठीला धरतायत असा आरोपही शरद राव यांनी केला.

close