इतर क्षेत्राही एफडीआयला परवानगी ?

October 3, 2012 1:13 PM0 commentsViews: 5

03 ऑक्टोबर

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील दिल्यानंतर आता इतर क्षेत्रातही एफडीआयला परवानगी देण्याचा निर्णय उद्या होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळात उद्या विमा आणि निवृत्ती वेतन सुधारणा विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या दोन्ही क्षेत्रात सध्या असलेल्या 26% परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्के करण्याचा सरकारचा विचार आहे. एफडीआयची मर्यादा वाढवण्याला केंद्र सरकारची मान्यता असली तरी तृणमूलच्या विरोधामुळे पावसाळी अधिवेशनात ही विधेयकं मांडता आली नव्हती.

close