‘ शुद्ध बीजापोटी ‘ या नाटकाचा नवा विश्वविक्रम

December 1, 2008 10:15 AM0 commentsViews:

1 डिसेंबर, मुंबईमाधुरी निकुंभआजपर्यंत मराठी रंगभूमीवर सलग पाच प्रयोगांचा विक्रम झाला होता. पण शुद्ध बीजापोटी या नाटकानं सर्व विक्रम मोडीत काढत एका दिवसांत सलग सहा प्रयोगांचा विश्वविक्रम केला आहे.दोन कुटुंब, त्यातल्या तरुण मुलांचं आंतरजातीय प्रेम आणि मग घरातून येणारा नकार असा काहीसा ' शुद्ध बीजापोटी ' या नाटकाचा विषय आहे. या नाटकांतून समाजाचं वास्तव चित्रण घडल्याशिवाय राहत नाही. ' वादानं कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. उलट मानसिक त्रास तेवढा होतो. हा संदेश नाटकांतून देण्याचा प्रयत्न केला आहे ', असं ' शुद्ध बीजापोटी ' या नाटकाचे लेखक प्रेमानंद गज्वी यांचं म्हणणं आहे. या नाटकाचे मुंबईतल्या 'रवीन्द्र नाट्य मंदिर ' मध्ये सलग सहा प्रयोग झालेत. ' नाटक चालू घडामोडींवर भाष्य करतं. नाटक लोकांना आवडेलच, असं नाटकात प्रमुख भूमिका करणारे अभिनेता गिरीश ओक म्हणाले. आंतरजातीय विषयावर भाष्य करणार्‍या या नाटकात अंगावर येणारे बरेच प्रसंग आहेत. जातीयवादाचे सरळ पडसाद त्यात दिसतात.आपला समाज कितीही प्रगत झाला तरीही तो आजही जातीवादाच्या पगड्यात अडकलाय हे प्रेक्षकांना पटवून देणारं हे नाटक झालं आहे.

close