निकृष्ट कामाचा गूळ धरणाला फटका

October 3, 2012 2:25 PM0 commentsViews: 16

03 ऑक्टोबर

अव्वाच्या सव्वा किमती वाढवायच्या आणि धरणांची कामे वर्षानुवर्ष सुरु ठेवायची आणि याच कामातून संगनमत करुन करोडोच्या निधीच्या अपहार करायचा. अशा प्रकारची अनेक प्रकरणं आता उघडकीस येत आहेत.अशाच प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या गूळ धरणाला बसलाय. धरणाच्या मध्यम प्रकल्पाची सरफेस लेव्हल वाहून गेल्यानं पाण्याची गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या धरणाचं काम 30 वर्षापासून सुरु आहे.आणि याच धरणाची जबाबदारी असलेले कनीष्ठ अभियंता व्ही एस पाटील हे तब्बल 25 वर्षांपासून या एकाच जागी काम करत आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना न केल्यानं या प्रकल्पाच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित केली जातेय.

close