‘एलएलबी डीग्रीप्रकरणी 3 अधिकारी दोषी’

October 10, 2012 4:53 PM0 commentsViews: 9

10 ऑक्टोबर

सिध्दार्थ लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका चित्रा साळुंखे यांच्यावर झालेल्या अन्याय प्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलीस महासंचालकांचा हा अहवाल आता उपलब्ध झाला आहे. या अहवालात तीन वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात आलंय. ब्रिजेश सिंग , नवल बजाज आणि एमएस राठोड अशी या अधिकार्‍यांची नावं आहे. चित्रा साळुंखे यांनी आयपीएस अधिकारी के एल बिष्णोई यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांचाच छळ करण्यात आला होता. सिध्दार्थ लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका होत्या. त्या परीक्षक असताना आयपीएस अधिकारी के.एल.बिष्णोई यांनी एल.एल.बीची परीक्षा न देताच ते पास झाले होते. याबाबत साळुखे यांनी कॉलेजकडे तसंच पोलिसात तक्रार केली होती. मात्र, नंतर साळुंखे यांचाच छळ करण्यात आला. त्याबाबत साळुंखे यांनी मानवी हक्क आयोग, केंदि्रय एससीएसटी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या.यावेळी आयोगाच्या आदेशानुसार पोलिसांनी चौकशी न करता खोटे रिपोर्ट पाठवले होते. या बाबत चित्रा सांळुंखे यांनी मुंबईत हायकोर्टात याचिका दाख केल्या नंतर कोर्टाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

close