महाराष्ट्राच्या विरोधानंतरही राष्ट्रपतींनी केलं उद्घाटन

October 11, 2012 9:33 AM0 commentsViews: 2

11 ऑक्टोबर

महाराष्ट्राच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारच्या बेळगावमधील नव्या विधानभवन इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. दरम्यान राष्ट्रपतींच्या बेळगाव दौर्‍याविरोधात कोल्हापूर,सांगली,सातार्‍यासह बेळगांवमधेही तीव्र निदर्शनं झाली. या निदर्शनात सीमावासीयांसोबत महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना,आरपीआय कार्यकर्तेही सहभागी झाले. राष्ट्रपतींचा हा पूर्वनियोजीत दौरा रद्द व्हावा ही या आंदोलकांची मागणी होती. बेळगांवमधे आतापर्यंत सुमारे 130 आंदोलकांना पोलिसांना स्थानबध्द केलंय. वृत्तांकनासाठी आलेल्या मराठी पत्रकांनाही पोलिसांच्या या दडपशाहीचा फटका बसला. आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ दिनेश केळुस्कर यांनाही वृत्तांकनासाठी मज्जाव करुन पोलिसांनी 2 तास स्थानबध्द केलं होतं.

close