‘मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार रहा’

October 10, 2012 7:52 AM0 commentsViews: 7

10 ऑक्टोबर

मुदतपूर्व निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावं असे आदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. बडोदा इथं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पवारांनी हे आदेश दिले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांची तशी तयारी असते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, पण राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा दिल्या जाव्यात अशी मागणी यावेळी पवारांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार गैरहजर राहिले. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेसाठी राजीनामा देणारे अजित पवार कार्यकारणीला आले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यातचं बडोद्यात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरुन, सुप्रिया सुळेंना प्रोजेक्ट करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे अजितदादांचा संघर्ष अजून संपला नसल्याचं दिसतंय. पण अजित पवार आजारी असल्याचं कारण राष्ट्रवादीकडून देण्यात येतंय.

close