नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये 2 कैद्यांची फ्री स्टाईल हाणामारी

October 12, 2012 1:27 PM0 commentsViews: 7

12 ऑक्टोबर

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या नाशिक रोडच्या कैद्यांमध्ये वॉर्डमध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या प्रकरणी अजीत साटम आणि जाफर खान या दोन कैद्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. आजारी असल्याचं कारण दाखवून जेलची हवा टाळून हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या व्हीआयपी कैद्यांची बातमी आयबीएन-लोकमतनं वारंवार प्रकाशात आणली होती. आता साटम आणि खान यांच्यातल्या हाणामारीनं या आजारी कैद्यांच्या आजारपणाचं बिंग फुटलंय. दरम्यान, आय.जी मीरा बोरवणकर यांनी नाशिक रोड जेलमधल्या या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

close