विविध मागण्यासाठी साखर कामगारांचं आंदोलन

October 12, 2012 3:10 PM0 commentsViews: 1

12 ऑक्टोबर

साखर कामगाराच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुण्यात साखर संकुल इथं महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कामगारांनी आंदोलन केलं. साखर उद्योग व जोड धंद्यातील कामगाराच्या वेतन व सेवा शर्तीसाठी करण्यात आलेल्या कराराची अंमलबजावणी करावी तसेच साखर कामगारांना बँकेमार्फेत पगार देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच साखर कामगारांची थकीत असलेली 500 कोटी रुपयांची रक्कम त्वरीत मिळावी ही प्रमुख मागणीही कामगारांनी केली. या आंदोलनात जवळपास चार हजार साखर कामगार सहभागी झाले होते.

close