हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा

October 10, 2012 7:50 AM0 commentsViews: 6

10 ऑक्टोबर

हक्काच्या घरांसाठी पुन्हा एकदा गिरणी कामगार मुंबईत रस्त्यांवर उतरले आहेत. आज गिरणी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. गिरणी कामगारांना घरं मुंबईतच दिली पाहिजेत अशी मागणी गिरणी कामगारांनी केली. राज्य सरकारने ठरवलेल्या 7 लाख 40 हजार रुपये किंमतीला घरं विकत घेण्यास गिरणी कामगारांनी तयारी दर्शवली आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला आहे.

close