बेस्ट बस आणि वीजच्या दरवाढीचा प्रस्ताव

October 10, 2012 10:07 AM0 commentsViews: 27

10 ऑक्टोबर

मुंबईत बेस्ट बस भाडे 1 रुपयाने तर विजेचे दर 4 टक्क्यानं वाढविण्याचा प्रस्ताव बेस्टनं आपल्या येणार्‍या अर्थसंकल्पात प्रस्तावित केला आहे. बेस्ट उपक्रमाला 2013-14 या आर्थिक वर्षाचा 1 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केलाय. बेस्टचे महाव्यवस्थापक ओ.पी.गुप्ता यांनी ही वाढ आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित केली. गेल्या काही काळात झालेली पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ लक्षात घेता त्याचबरोबर वीज खरेदीच्या दरातली चढउतार लक्षात घेता विजेचा दर 4 टक्केनं वाढवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. लगेचच ही भाववाढ होणार नसली तरी आगामी अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा भाववाढीचा प्रस्ताव चर्चेला येईल.

close