महालक्ष्मीच्या दारी ‘गौरी’ जिंकल्या

October 10, 2012 10:26 AM0 commentsViews: 15

10 ऑक्टोबर

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरातल्या प्रसादाचा वाद आता मिटलाय. प्रसाद म्हणून पुन्हा लाडूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असून या प्रसादाचं कंत्राट हे पहिल्याच गौरी बचत गटाला देण्यात येणार आहे. त्यामुळे पुरोगामी कोल्हापूरमध्ये सुरु झालेल्या वादावर आता पडदा पडला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीला देवस्थान समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिलांना मासिक पाळी येत असल्यानं त्यांना प्रसादाचं कंत्राट देवू नये, प्रसादाचं पावित्र्य धोक्यात येईल अशी मागणी मनसेनं केली होती. त्यावरुन अनेक वादंगही निर्माण झाले होते. तसंच प्रशाससनानंही मनसेला झुकतं माप देत लाडू प्रसाद रद्द करुन पेढ्‌याचा प्रसाद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामाजिक स्तरातला होणारा विरोध पाहून आज प्रशासनाने हा निर्णय घेतला.

close