गुंडाच्या हत्येप्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर निलंबित

October 12, 2012 3:15 PM0 commentsViews: 2

12 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावानं केलेल्या गुंडाच्या हत्येप्रकरणी आणखी एक इन्स्पेक्टर आणि पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलंय. आर. के. जाधव असं निलंबित इन्स्पेक्टरचं नाव आहे. दरम्यान, गुंडाच्या हत्येनंतर आज 3 दिवसांनी आयुक्त अंकुश धनविजय यांनी या भागाला भेट दिली. हे प्रकरण हाताळण्यात पोलीस कमी पडले, अशी कबुली त्यांनी दिली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही वरिष्ठ पोलिसांची चौकशी करून कारवाईचं आश्वासन दिलंय.

close