दुसर्‍याच्या नावे परीक्षा देणार्‍या तरुणाला अटक

October 11, 2012 4:24 PM0 commentsViews: 7

11 ऑक्टोबर

परिक्षेत डमी विद्यार्थी बनून पेपर सोडणार्‍या एका तरुणाला पुणे पोलिसानी अटक केली आहे. गौस शब्बीर शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये सत्र आणि वार्षिक परीक्षेत गौस शब्बीर शेख डमी विद्यार्थी बनून परिक्षा द्यायचा. एका पेपरसाठी तो विद्यार्थ्यांकडून 20 ते 25 हजार रुपये घेत होता. गौस शब्बीर शेख कडून पोलिसांनी एक मारूती स्विफ्ट कार , 14 मोबाईल संच, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे परीक्षा प्रवेश पत्र आणि गुण पत्रिका हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात गौस शब्बीर शेखच्या इतर सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहे.

close