पिंपरी-चिंचवड पालिका अजितदादांना विसरली

October 10, 2012 10:35 AM0 commentsViews: 101

10 ऑक्टोबर

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा तिसाव्या वर्धापन दिन उद्या साजरा होणार आहे. यासाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. पण निमंत्रण पत्रिकेतून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर मोहिनी लांडे यांनी ही निमंत्रण पत्रिका तयार केली. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार असंच समीकरण होतं. पण आता निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या कोणतंही मोठं पद नसल्यानं त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकणं योग्य आहे की अयोग्य अशा द्विधा मनस्थित असल्यानं त्यांचं नाव न टाकल्याचा धक्कादायक खुलासा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. पण दुसरीकडे या निमंत्रण पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे यांचं नवा टाकण्यात आलंय. सुळे या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत आणि असं असतानाही त्यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत कसं यावर मात्र कुणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.

close