रिक्षाचालकाकडून IAC च्या कार्यकर्त्याला मारहाण

October 12, 2012 5:25 PM0 commentsViews: 5

12 ऑक्टोबर

वसईत रिक्षा चालकांची दादागिरी आणि फसवणुकीविरुद्ध आवाज उठवणार्‍या इंडिया अगेंस्ट करप्शनच्या कार्यकर्त्याला एका रिक्षा चालकानं बेदम मारहाण केली. राकेश सरावंगी असं या कार्यकत्याचं नाव आहे. मीरा रोडस्टेशन जवळ ही घटना घडली. मीटर न लावणं, मीटरमध्ये फेरफार करणं, भाडं नाकारणं, जादा भाडं नाकरणं या कारणांमुळे वसईत प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. याविरुद्ध राकेश सरावंगी जनजागृती करत होता. त्याचा राग आल्यानंच राकेशला मारहाण करण्यात आली.

close