…तर महायुतीचा गंभीर विचार करावा लागेल -आठवले

October 11, 2012 4:26 PM0 commentsViews: 69

11 ऑक्टोबर

चौथा पार्टनर म्हणून मनसेला महायुतीमध्ये घेतलं जात असेल तर गंभीर विचार करावा लागेल असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं गोपीनाथ मुंडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा मनसेला सोबत घेऊन जायचा विचार असला तरी हा निर्णय महायुतीनी एकत्र घ्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलंय. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा 14 ऑक्टोबर पर्यंत दिली नाही तर जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

close