घोटाळा लपवण्यासाठी भुजबळांनी वाटले 40 फ्लॅट्स -सोमय्या

October 10, 2012 11:38 AM0 commentsViews: 6

10 ऑक्टोबर

भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. छगन भुजबळांनी सर्कल इन्फ्राटेक कंपनीच्या घोटाळ्यासाठी 40 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना लक्झरी फ्लॅट्स दिले. प्रत्येक फ्लॅटची किंमत 3 ते 4 कोटी रुपये आहे. या अधिकार्‍यांची नावे 15 ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याचंही सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे. काल मंगळवारी सोमय्या यांनी रॉबर्ट वडरांसारखा घोटाळा महाराष्ट्रातही झाला, असा दावा केला होता. ब्लू सर्कल इन्फ्राटेक कंपनीकडून छगन भुजबळांना नवी मुंबईत 100 कोटींची जमीन फुकट मिळाली. तर कृष्णा खोरे घोटाळ्याला रामराजे-नाईक निंबाळकर जबाबदार असल्याचंही किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. सिंचन घोटाळ्यातला पैसा राष्ट्रवादीनं 2009 च्या निवडणुकीत वापरल्याचा गौप्यस्फोट सोमय्यांनी केला होता.

close