भ्रष्टाचाराविरोधात भाजप उद्यापासून रस्त्यावर

October 10, 2012 11:56 AM0 commentsViews: 1

10 ऑक्टोबर

भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्यापासून राज्यात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आंदोलन करणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी हटाव, भ्रष्टाचार मिटाओ, महाराष्ट्र बचाओ अशी घोषणा भाजप देणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. महाराष्ट्राची प्रतिमा भ्रष्ट राज्य अशी झालीय आणि याला राज्यकर्ते आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात भाजप राज्यभरात 5 सभा घेणार आहे.

close