मंत्रालयाचा मेकओव्हर 250 कोटींच्या घरात, निविदा रखडणार ?

October 13, 2012 10:06 AM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

आगीत तीन मजले भस्मसात झाल्यानंतर मंत्रालयाचा मेकओव्हर करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यासाठी मंत्रिमंडळाने 80 कोटी रू.खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पण शुक्रवारी यासाठीची टेंडर्स उघडली असता ही टेंडर्स दिडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे दुरस्तीबरोबरच अंतर्गत सजावट, सोयीसुविधा आणि इतर कामं मिळून मंत्रालय मेकओव्हरचा एकूण खर्च 250 ते 300 कोटी रपयांवर जाणार आहे.मंत्रालय दुरूस्तीसाठी एल अँड टी , शापुरजी पालनजी आणि युनिटी कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांनी टेंडर्स भरली होती. ही टेंडर्स साधारणत: 100 कोटींच्या आसपास असतील असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना वाटत होतं पण टेंडर्स ची रक्कम अधिक आहे. त्यामुळे आता कामाचा दर्जा हा निकष लावायचा की दुसरा पर्याय शोधायचा याचा अंतिम निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील एक समिती घेणार आहे. त्यामुळे खर्चाचा नवा प्रस्ताव तयार होईपर्यंत मंत्रालयाचा मेकओव्हर रखडणार हे स्पष्ट झालंय.

close