भटके विमुक्त संघटनेनं भरवली पाचपुतेंच्या घरासमोर महापंचायत

October 14, 2012 12:52 PM0 commentsViews: 99

14 ऑक्टोबर

भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या घरासमोर आज भटक्या विमुक्तांची महापंचायत भरुन अनोख्या पध्दतीने आंदोलन केलं. अहमदनगर जिल्ह्यातील शि्रगोंद्यातील काष्टी गावात राज्यभरातील आदिवासी भटक्या विमुक्त जमाती संघटनेतर्फे ही महापंचायत आयोजित केली होती. बापट आयोगाच्या शिफारशींची अंमलबजवणी करण्याची मागणी यात करण्यात आली. यासदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करु आणि हा विषय मंत्रिमंडळात मांडू असं आश्वासन पाचपुते यांनी दिलं.

close