कोल्हापुरात टोल विरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

October 13, 2012 8:09 AM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात वादग्रस्त रस्ते विकास प्रकल्प तयार करणार्‍या आयआरबी कंपनीनं टोल वसुली करु नये यासाठी शहरातल्या विद्यार्थ्यांनी आज धडक मोर्चा काढला. 15 हजारांहून अधिक विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी टोलविरोधातल्या घोषणांनी शहरातले सगळे रस्ते दूमदूमून गेले होते. शहरातल्या सर्वच शाळांचे विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आयआरबी कंपनीच्या करारानुसार शहरात 30 वर्षे टोल द्यावा लागणार आहे आणि त्याविरोधात टोलविरोधी कृती समिती लढा देतेय.

close