अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात

October 12, 2012 9:55 AM0 commentsViews: 4

12 ऑक्टोबर

कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या चौकशीच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करणार्‍या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

close