नायब तहसीलदाराला जाळण्याचा वाळू माफियांकडून प्रयत्न

October 14, 2012 1:00 PM0 commentsViews: 3

14 ऑक्टोबर

जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे नायब तहसीलदार अशोक जगदेव यांना वाळू माफियांकडून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. बोरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जगदेव यांनी मोहिम उघडली आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास जगदेव यांना उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानं ते या नदीपात्रात पोहोचले आणि त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण वाळू उपसा करणार्‍या चौघांनी जगदेव यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं. जवळच असलेल्या गावकर्‍यांनी धाव घेतल्यानं जगदेव बचावले. दरम्यान, वाळूमाफिया घटनास्थळावरुन पळून गेले. जगदेव यांची फिर्याद घेण्यासाठी पोलीस मात्र टाळाटाळ करत आहे.

close