अरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका

October 13, 2012 10:17 AM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. रात्रभर ताब्यात ठेवल्यानंतर त्यांची आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यंाची सुटका करण्यात आली. पण आपण सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पुन्हा एकदा केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. आता त्यांनी संसदभवन मार्गावर आंदोलन सुरु केलं आहे. काल शुक्रवारी सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत धरणं आंदोलन केलं. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

close