नांदेड पालिका निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

October 14, 2012 2:52 PM0 commentsViews: 7

14 ऑक्टोबर

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी आज 58 टक्के मतदान झालंय.महापालिकेच्या 40 प्रभागांसाठी आज मतदान पार पडलं. 81 जागांसाठी 510 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं आहे.उद्या मतमोजणी होणार आहे. अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनीसुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ही निवडणूक काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मानली जात आहे. महापालिकेत पहिल्यांदा शिवसेना आणि त्यानंतर सलग 3 वेळा काँग्रेसची एकहाती सत्ता होती. दोन बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

close