सोनिया गांधींच्या बचावासाठी पंतप्रधानांचा पुढाकार

October 12, 2012 10:09 AM0 commentsViews: 14

12 ऑक्टोबर

खासगी आयुष्य आणि माहितीचा अधिकार कायदा यात समतोल असला पाहिजे असं मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलंय. नरेंद्र मोदींनी सोनिया गांधी यांच्या परदेश दौर्‍यांवर 1,880 कोटी रुपये खर्च हा सरकारच्या तिजोरीतून झाल्याचा आरोप केल्यानं सध्या वाद निर्माण झाला. तसेच ही माहिती माहिती अधिकारातून उघड झाल्याचं मोदींनी म्हटलंय. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदींना उत्तर दिलं होतं. पण आता खुद्द पंतप्रधानांनीच सोनिया गांधीचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा यांनी सोनिया गांधींच्या आजारपणाचा खर्च सरकारने केला नाही तसेच सोनियांनी सरकारकडे खर्च मागितला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आरटीआय कार्यकर्ते नवील कुमार यांनी सोनिया गांधींच्या परदेश दौर्‍यावर खर्चाची माहिती मागवली होती. याचा पुराव घेऊन नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर टीका केली होती. पण नवीन कुमार यांनी मोदींचा दावा फेटाळून लावला होता. आपल्याला फक्त सोनियांच्या परदेश दौर्‍याबद्दल माहिती मिळाली होती, त्यांच्या उपचाराच्या खर्चाबद्दल नाही. 1 हजार 880 कोटींच्या आकड्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

close