नागपूर पोलीस कमी पडले -पोलीस आयुक्त

October 12, 2012 10:51 AM0 commentsViews: 6

12 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावानं केलेल्या गुंडांच्या हत्येप्रकरणी आता पोलीस कर्मचार्‍यांचीच चौकशी होणार आहे. यात पोलीस कमी पडले अशी कबुली नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी दिली. वसंतराव नाईक झोपडपट्टीत आज तीसर्‍या दिवशी ही लोकांच्या मनात गुंड भुर्‍याची भिती कायम आहे नागपूरला परतल्यावर पोलीस आयुक्त अकुश धनविजय यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांसह या भागात जाऊन लोकांची भेट घेऊन भुर्‍यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मंगळवारी रात्री मुख्य गुंड शेख अक्रमला संतप्त जमावाने भर रस्त्यावर ठेचून मारले. मात्र त्यांच्या तावडीतून त्याचा भाऊ इक्बालाने पळ काढला त्यालाही आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नागरीकांनी केली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे.

close