झी ग्रुपचे अध्यक्ष सुभाषचंद्र, पुत्र पुनित यांच्याविरुद्ध FIR दाखल

October 13, 2012 11:28 AM0 commentsViews: 12

13 ऑक्टोबर

100 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी झी समूहाचे अध्यक्ष सुभाषचंद्र आणि त्यांचा मुलगा पुनित गोयल यांना सहआरोपी करण्यात आलं आहे. ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, दमदाटी करणे आणि बदनामी करणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. सुभाषचंद्र गोयल हे तीस टीव्ही चॅनल्स आणि डीएनए हे वृत्तपत्र चालवणार्‍या मीडिया हाऊसचे प्रमुख आहेत. सप्टेंबर महिन्यात जिंदाल स्टील आणि पॉवर लिमिटेडविरुद्ध, या मीडिया हाऊसमार्फत सतत ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या. त्या थांबवण्यासाठी, 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप जिंदाल उद्योग समूहानं केलाय. महत्वाचं म्हणजे जिंदाल समुहाच्या काही अधिकार्‍यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन करुन पुरावे गोळा केलेत.आणि त्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

close