अशोकरावांनी गड राखला, पालिकेवर काँग्रेसचा झेंडा

October 15, 2012 9:25 AM0 commentsViews: 3

15 ऑक्टोबर

नांदेड महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीत काँग्रेसनं आपली सत्ता कायम राखली आहे. 41 जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलंय. अशोक चव्हाणांनी एकहाती आपला गड राखला आहे. आदर्श घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्रीपदावरु पायउतार झाल्यानंतर, अशोक चव्हाणांसाठी हा पहिलाचं मोठा विजय आहे. काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर समाधानं मानाव लागलंय. तर शिवसेनेनं 13 जागांवर विजय मिळवलंय. तर एमआयएम आणि संविधान आघाडीला 13 जागा मिळाल्या आहे. पालिकेच्या निवडणुकीअगोदर शिवसेनेनं मनसेशी हातमिळवणी केली होती. पण या हातमिळवणीची सत्तेचं स्वप्न अशोकरावांनी धुळीस मिळवलं. शिवसेनेला 10 जागांवर समाधान मानावे लागले तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही.

दोन वर्षांनंतर अशोक चव्हाणांच्या चेहर्‍यावर हसू पसरलंय. आदर्श प्रकरणानंतर बाजूला पडलेल्या अशोकरावांनी नांदेड वाघाळा महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादीने विरोधकांशी साटंलोटं केलं असतानाही त्यांनी विजय खेचून आणलाय. 81पैकी 41 जागा मिळवत त्यांनी आधीपेक्षा 2 जागा जास्त मिळवल्या आहेत. गुरु ता गद्दी सोहळ्यासाठी मिळालेल्या 2 हजार कोटी रुपयांमुळे शहराचा कायापालट झाला आणि त्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला.

काँग्रेसच्या 41 जागा खालोखाल.. महायुतीला 14 तर राष्ट्रवादीला 10 जागांवर समाधान मानावं लागलं. हैद्राबादमधल्या मजलिसे इत्तेहादे मुस्लिमीन या पक्षाला मात्र चक्क 13 जागा मिळाल्या. शहरातल्या 20 टक्के मुस्लिम मतांचा त्यांना फायदा झाला.

नांदेडची निवडणूक अशोकरावांसाठी करो या मरोची होती. ते गेल्या एका महिन्यापासून शहरात ठाण मांडून होते. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष ठाकरे असे सर्व महत्त्वाचे नेते आले. आता लवरकरच अशोकरावांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यांनी एआयएसीसीच्या सरचिटणीसपदाची मागणी केली आहे. तसं झाल्यास, ते राजकारणात सक्रिय होऊ शकतील.

नांदेड पालिकेचा निकालकाँग्रेस- 41 जागाराष्ट्रवादी- 10 जागाशिवसेना- 14 जागाभाजप- 02 जागाएमआयएम- (मजलिसे इत्तेहादे मुस्लिमीन)-13 जागा

अपक्ष – 1

close