पंच बसल्याने महिला बॉक्सर कोमात

October 12, 2012 11:03 AM0 commentsViews: 6

12 ऑक्टोबर

बॉक्सिंगच्या सरावादरम्यान जोरदार पंच बसल्यानं एक महिला बॉक्सर कोमात गेल्याची घटना मुंबईत घडलीय. कांदिवली इथल्या स्पोर्ट्स ऍथोरिटी ऑफ इंडिया इथं ही घटना घडली. 19 वर्षांची मनिषा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नूर नावाच्या एका पुरुष बॉक्सरबरोबर इथं सराव करत होती. पण या सरावादरम्यान नूरनं जोरदार पंच लगावला. हा पंच मनिषाच्या डोक्यावर बसला आणि तिच्या मेंदुला रक्त पुरवठाच बंद झाला. मनिषा जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीनं मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर मनिषाचे कोच आणि बॉक्सर नूरविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनिषानं कॉलेज आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्यात आणि सध्या ती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सराव करत होती.

close