मराठवाड्याच्या ‘पाणीबाणी’वर मुख्यमंत्र्यांची मलमपट्टी

October 13, 2012 12:53 PM0 commentsViews: 12

13 ऑक्टोबर

राज्यात सिंचनाच्या प्रश्नावरून राजकारण तापलं असतानाच मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत निळवंडे धरणातून तात्काळ अडीच टीमसी पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

मराठवाड्याच्या दुष्काळी स्थितीबाबत आज मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण मराठवाड्यात दुष्काळ पडल्यामुळे अनेक धरणं कोरडी पडली आहे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातच चार दिवसाआड पाणी सोडलं जातं आहे. संपूर्ण मराठवाडा हा जायकवाडी धरणावर अवलंबुन आहे. जायकवाडीत सध्या फक्त 3 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडीमधून औरंगाबदसह 210 गावांना पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर उद्योगासाठी आणि परळीतल्या औष्णिक उर्जा केंद्रासाठीही पाणी पुरवढा केला जातो.

मराठवाड्याला 9 टीएमसी पाणी देण्याची मागणी गेली अनेक दिवस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. त्यावेळी अडीच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील इतर धरणातून पाणी सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठवाडा तहानलेलाच – अनेक धरणं कोरडी- गावांमध्ये अजूनही टँकरनं पाणीपुरवठा- मराठवाड्याला 9 टीएमसी पाण्याची गरज- खरीप आणि रब्बी पिकही गेलं हातून

close