‘नांदेड पालिका निवडणुकीत काँग्रेसने पैसे वाटले’

October 15, 2012 9:52 AM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर

या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगला. अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी स्वत: इथं सभा घेतल्या. पण तरीही राष्ट्रवादीला इथं यश मिळवता आलं नाही. मात्र काँग्रेसनं या निवडणुकीत पैसे वाटून मतं विकत घेतली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. तर काँग्रेसला हरवण्यासाठी विरोधकांनीच पैशांचा वापर केला, पण जनतेनं त्यांना धडा शिकवला असं उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलंय.

close