सोनसाखळी चोराला जमावाने चोपले

October 12, 2012 11:17 AM0 commentsViews: 5

12 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावाने गुंडाला ठेचून मारल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डोंबिवली इथं एका सोनसाखळी चोराला जमावाने बेदम मारहाण केलीये. सोनसाखळी चोरताना त्याला मारहाण करण्यात आली. दीपक काकडे असं या चोराच नाव आहे. रस्त्यावरुन एक महिला जात असताना रिक्षातून आलेल्या चोरानं तिची साखळी ओढली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या तिच्या नातवाईकांवर या चोरानं हल्ला केला.यावेळी बचावासाठी त्या महिलेच्या नातेवाईकानं चोरावर गोळीबारही केला. या गोळीबारात चोर जखमी झाला. जमावाने चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

close