ऊर्जा खात्यातही मोठा गैरव्यवहार -सुब्रतो रथो

October 15, 2012 9:55 AM0 commentsViews: 4

15 ऑक्टोबर

सिंचनापाठोपाठ ऊर्जा खात्यातही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द महानिर्मितीचे माजी एमडी सुब्रतो रथोंनी केला आहे. सरकारी कंपनीला डावलून खासगी कंपन्यांकडून महागडी वीज खरेदी केल्याचा त्यांचा दावा आहे. 2 रुपये 72 पैसे प्रति युनिट मिळणारी वीज 4 रुपये 10 पैशांनी खरेदी केली. त्यामुळे सरकारला 30 कोटींचा फटका बसला आहे. जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्लूपीएल (JSWPL) आणि केएसके (KSK) एनर्जीच्या वर्धा पॉवर या कंपन्यांना यामुळे फायदा झाल्याचं सुब्रतो रथोंनी म्हटलं आहे. रथोंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. हा सर्व गैरव्यवहार झाला त्यावेळी ऊर्जाखातं अजित पवार यांच्याकडे होतं.

close