शिवाजी पार्कवरच होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

October 15, 2012 10:00 AM0 commentsViews: 36

15 ऑक्टोबर

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आज मुंबई हायकोर्टाने दसरा मेळ्याव्याला सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई महानगर पालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे आमदार ऍड अनिल परब यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी या अटीसह मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे.

close