आयपीएलमधून ‘डेक्कन’चा पत्ता कट

October 12, 2012 12:36 PM0 commentsViews: 4

12 ऑक्टोबर

आयपीएलमधून डेक्कन चार्जर्सचा पत्ता अखेर कट झाला आहे. आज बीसीसीआयने हा निर्णय घेतला. आर्थिक नियमांचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून आधीचे मालक डेक्कन क्रोनीकलकडून फ्रँचाईजी काढून घेण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयनं बँक गँरटी भरण्यासाठी मुदत दिली होती. पण ठराविक मुदतीत 100 कोटी रुपयांची बँक गँरंटी भरता न आल्यानं डेक्कन चार्जर्सची टीम बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल 6 च्या हंगामात टीम खेळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या डेक्कन चार्जर्ससाठी मालकाचा शोधाशोध सुरु झाला. बीसीसीआयनं टीमसाठी एख टेंडर काढलं. पण केवळ एकच टेंडर बीसीसीआयकडे आलं. आंध्रप्रदेशातील पीव्हीपी फिल्म्स डेक्कन चार्जर्स टीम विकत घेण्यासाठी उत्सुक होती. यासाठी त्यांनी 855 ते 915 कोटी रुपायांचं टेंडर दिलं. पण त्यांचं हे टेंडर रद्द करण्यात आलं. याआधी बँकांनी टीमसाठी जे लोन दिलंय ते अजूनही वसूल झालेलं नव्हतं. या कारणावरुनच पीव्हीपीचं टेंडर रद्द करण्यात आलं होतं. आणि आज अखेर आयपीएलच्या गव्हर्निंग कौंन्सिलच्या या निर्णयावर शिक्कमोर्तब केलं.

close