मलालावर हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा

October 13, 2012 3:03 PM0 commentsViews: 4

13 ऑक्टोबर

तालिबान्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मलाला युसुफझई हिच्या समर्थनासाठी आज ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली मुंब्रामध्ये हा मोर्चा निघाला. यात 8 हजार शाळकरी विद्यार्थांनी सहभाग घेतला. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात राहणारी मलाला तालिबानी दहशतवादाविरोधात काम करते. दरम्यान, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं तिच्यावर उपचार करणार्‍या लष्करी हॉस्पिटलमधून सांगण्यात आलंय.

close