राणी मुखर्जीच्या भावाला विनयभंग केल्याप्रकरणी अटक

October 15, 2012 10:42 AM0 commentsViews: 11

15 ऑक्टोबर

अभिनेत्री राणी मुखर्जीचा भाऊ राजा मुखर्जीला विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. टिव्ही सिरीयलमध्ये काम करणारी अभिनेत्री प्रिया मिश्रा हीने आपण लिहलेली कथा राजा मुखर्जी यांना ऐकवायची होती. यासाठी तिने राजाशी संपर्क साधला. राजा यांनी तिला संध्याकाळची वेळ दिली. या भेटीनंतर तीने राजावर विनयभंग केल्याचा आरोप केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी राजा मुखर्जीची वैद्यकीय तपासणी करुन अटक केली. सध्या त्याला अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय.

close