राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट

October 13, 2012 3:06 PM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काल रात्री उशीरा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची कराडमध्ये भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये ऊसदराबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. तर दूधाला सरकारनं 3 रुपये अनुदान द्यावं आणि गेल्यावर्षीच्या ऊसबिलाबाबत अंतिम बिल म्हणून 500 रुपये द्यावेत अशी मागणी शेट्टी यांनी पवार यांच्याकडं केली आहे. तसंच देशात दूध पावडरचा साठा जास्त असल्यानं आयात थांबवून राज्य आणि केंद्र सरकारनं धोरण ठरवावं अशी मागणीही त्यांनी पवार यांच्याकडं केली. त्याबाबत पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही खासदार शेट्टी यांनी सांगितलं.

close