एनडीएच्या पासिंग परेडमध्ये शहिदांना श्रद्धांजली

December 1, 2008 9:43 AM0 commentsViews: 2

1 डिसेंबर पुणेस्नेहल शास्त्रीमाणुसकीला काळीमा फासणारी मुंबईतील घटना लक्षात घेता पुण्यातली एनडीएची पासिंगआऊट परेड यावर्षी अगदी साध्या प्रकारे साजरी करण्यात आली. मुंबई हल्ल्याची किनार यावेळच्या परेडमध्ये होती. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून परेडच्यावेळी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीची ही 115 वी परेड. यावर्षीच्या परेडमध्ये जवळजवळ 745 कॅडेटसने भाग घेतला. ही परेड म्हणजे उत्तम शिस्तीचा नमुना. प्रत्येक कॅडेटच्या चेह-यावर पास झाल्याचा आनंद होता. पण मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांची आठवण त्यांच्या मनात होती. पंजाबचे राज्यपाल एस. एफ. रॉडरिग्ज हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या परेडमध्ये मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

close